आपला जिल्हा

शाही इमाम पंजाब यांचे 26 जानेवारी ला सेलूत व्याखानाचे आयोजन !

सेलू ( प्रतिनिधी ) संपूर्ण देशात लोकप्रिय असलेले पंजाब चे शाही इमाम मौलाना उस्मान सहाब लुधियानावी यांचा भारताच्या स्वातंञ्य लढाईत मूस्लीम समाजाचे योगदान तसेच धार्मिक विषयावर व्याख्याना चे आयोजन करण्यात आले आहे.
येथिल आठवडी बाजार परिसरात 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अध्यस्थांनी मूफती मोईजोदीन कासमि अमिर— शरीयत मराठवाडा राहणार आहे.भारताच्या स्वातंञ्या च्या लढाईत उस्मान सहाब यांचा परिवाराचा खूप मोठा इतिहास असुन त्याच्या पुर्वजांनी माहत्मा गांधी,सूभाष चंद्र बोस,भगतसिंग यांच्या बरोबर स्वातंञ लढाईत भाग घेवुन प्राणाची अहुती दिलेली आहे.भगतसिंगला फाशी झ्राल्यावर भगतसिंगाच्या कूटुंबाला आश्रय दिल्याबदल मौलानाच्या पूर्वजाला अनेक वर्ष इंग्रजानी तुरुंगात डांबुन ठेवले होते.भारत देशाला स्वातंञ्य मिळाल्या नंतर पंजाब सरकार च्या वतिने मौलामाच्या कूटूंबाला शेरे ए पंजाब हि पदवी देवून सन्मानीत करण्यात आले .
मौलाना उस्मान सहाब लूधियानवी हे पंजाब चे शाही इमाम असून अतिशय तरुण वयात ते संपुर्ण जगात प्रसिध्द झाले आहे .जग भरात त्यांचे लाखो अनूयायी आहे .
या कार्यक्रमास मोठया प्रमाणात हाजर राहावे असे अवहान संयोजक मोहम्मद याहिया खाॅन ,सय्यद इम्रान हाशमी व जमाते ऊलमा इक्राम व सर्व तरुण मंडळी सेलू यांच्पा वतिने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!