आपला जिल्हा

लॉयन्स क्लबच्या सेलूतालुका अद्यक्ष पदी सुयश पटवारी, तर सचिव डॉ. बाळासाहेब जाधव

सेलू (प्रतिनिधी ) येथील लॉयन्स क्लब च्या तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते सुयश पटवारी तर सचिव पदी डॉ.बाळासाहेब जाधव यांची सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हॉटेल परिवार येथे दिनांक 17 जानेवारी शुक्रवार रोजी लॉयन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल एम.जे.एफ. गिरीश सिसोदिया, माहिती अधिकारी मनोहर खालापूरे व परतूर तालुकाध्यक्ष प्रमोद टेकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अतुल लड्डा, डॉ. संदीप चव्हाण , डॉ. भानुदास कदम, मुकुंद सेपाळ, सौ.संगिता सिसोदिया , सौ.संजिवनी खालापुरे, प्रा.मधुकर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुका कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष- अजित सराफ, सहसचिव- डॉ.अनुराग जोगदंड, कोषाध्यक्ष- डॉ.शैलेश मालाणी गोल्डण मेंबर म्हणून डॉ.उमेश गायकवाड, डॉ.कुंदन राऊत, डॉ.कैलास आवटे, डॉ.आशिष मेहता, दत्तात्रय उर्फ अप्पूसेठ सोळंके, कुशल तांगडे, अनुप गुप्ता, राजेंद्र सराफ, डॉ.परेश बिनायके, डॉ. सुदर्शन मालाणी, सागर लोया, बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप चव्हाण, शपथ वाचन मनोहर खालापुरे, प्रार्थना सौ संजिवनी खालापुरे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर डॉ. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमा साठी श्रीमती शर्मिला मालाणी, श्रीमती मंगल जोगदंड , शिवनारायण मालाणी, डॉ अंजली भाबट – जाधव, डॉ अभिलाषा जोगदंड , डॉ योगिता मालाणी, सौ.रुचिका गुप्ता, सौ. पुजा सोळंके सौ छाया तांगडे, सौ रेणूका सराफ, डॉ अंकिता राऊत आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!