आपला जिल्हा

नागरे, राऊत, साडेगावकर ‘राष्ट्रवादी’त दाखल जिंतूर विधानसभा मतदारसंघ : राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण

सेलू ,दि.18(प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय साडेगांवकर, संत भगवानबाबा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब घुगे, लिंबाजीराव पुंजारे, अविनाश काळे यांच्यासह जवळपास 17 आजी-माजी सदस्यांनी शनिवार 18 जानेवारी रोजी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला.

आज पक्षप्रवेश केलेल्या व प्रसारमाध्यमांना दिलेल्या यादीत गणेशराव मुंढे, राजेंद्र नागरे, प्रकाशराव देशमुख, केशवराव बुधवंत, अ‍ॅड. सुनील बुधवंत, विनायकराव आडे, बाज मोहम्मद फैज मोहम्मद, उस्मान खान, रामजी घुगे, पंडीतराव घोलप, राजेश चव्हाण, गजानन वराड, अनंतराव कोरडे, केशवराव घुले, सौ. कमल लोखंडे, भागवत जोगदंड, अमित राठोड, गजानन घुगे, तसेहीन जाफरमियाँ देशमुख, रावसाहेब मुसळे, सुधाकर नागरे, कुबेर हुलगुंडे, भास्करराव नागरे, सुधाकरराव घुगे, भारत घुगे, संजय घुले, उमेश दराडे, श्रीनिवास घुगे, पवन भालेराव उध्दव दराडे, प्रभाकर आघाव, रमेश राख, अनिल लांडगे, जगन्नाथ काळे, पंढरी डोईफोडे, मोबीन कुरेशी, उस्मान पठाण, रामेश्‍वर राठोड, सोहेल अहमद अब्दुल कदीर, जाबेर मुल्ला, वसीद मजीद पठाण, सय्यद हाशम सय्यद अली, रामप्रसाद माघाडे, अर्जून वजीर, रावसाहेब खंदारे, लखन कुर्‍हे, गणेश काकडे, नितीन वाणी, दिलीप माघाडे, रमेशराव काठोळे, विश्‍वनाथ गनगे, मुजाहेद कादरी, शाकेर पठाण, पंढरीनाथ बिरगड, संतोष आंधळे, नवनाथ घुगे, सुभाषराव घुगे, गुबाल चौधरी, वाजेद कुरेशी, बद्रोद्दीन काजी, रहेमत अली, शिवशंकर तमशेटे, सलमान इनामदार, नानासाहेब निकाळजे, बाबासाहेब म्हेत्रे व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुधाकर कुर्‍हे यांची नावे प्रवेशकर्ते म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघांतर्गत हे नेते व माजी सदस्य हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्कात होते. पक्षाध्यक्ष पवार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर या नेते व माजी सदस्यांनी शनिवारी पक्षाच्या शिर्डी येथील अधिवेशनात पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्रीमहोदय, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!