गंगाखेड ( प्रतिनिधी) शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2024 एलिमेंट्री/ इंटरमिजिएट चा निकाल नुकताच लागला असून त्यात संत जनाबाई विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी *संत जनाबाई विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. इंटरमिजिएट A श्रेणी 04 विद्यार्थी, B श्रेणी 03 विद्यार्थी C श्रेणी 17 विद्यार्थी एकूण 24 विद्यार्थी पात्र झाले आहेत…तसेच एलिमेंट्री A श्रेणी 01विद्यार्थी B श्रेणी 07 विद्यार्थी व C श्रेणी 36 विद्यार्थी एकूण 43 विद्यार्थी पात्र झाले आहेत A श्रेणीत.. कु. श्रेया पवन कदम, वेदांत महामुने, कु.प्रतीक्षा संदीप सूर्यवंशी, कु. अक्षरा दादासाहेब पवार हे असून B श्रेणीत.. कु.श्रुती दिपक मुंडे, कु.श्रीशा दिपक मुंडे, कु.पुनम अशोक राठोड, कु.शिवकन्या ज्ञानोबा मुरकुटे, कु.साक्षी अनिल मुंडे, कु.साक्षी शिवशंकर काळे, कू.वंदिता भानुदास कांबळे कू. ज्ञानेश्वरी संजय हाके, कू.प्रज्ञा महादेव बडे, कू.आरती सुरेश लोखंडे हे आहेत.एली. 17 /इंटर.36 एकूण = 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दहावी तील 11विद्यार्थी एकूण =53 विद्यार्थ्यांना वाढीव गुनाचा लाभ मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाई श्री ज्ञानोबाजी मुंढे साहेब,सचिव श्री जी. डी.मुंढे सर, सहसचिव श्री कार्तिकजी मुंढे साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जी. एन.नागरगोजे सर, पर्यवेक्षक श्री जी.व्हि.मुंढे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. या परीक्षेसाठी यशस्वीतेसाठी *चित्रकला शिक्षक श्री साबणे सर यांनी परिश्रम घेतले त्या बद्द्ल त्यांचेही अभिनंदन केले आहे.