सेलू ( प्रतिनिधी ) शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2024 इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात नूतन विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षी नूतन विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 89.28,% लागला असून नूतन विद्यालयाचे एक विद्यार्थी ए ग्रेड तर चार विद्यार्थ्यांनी बी ग्रेड प्राप्त केला आहे वीस विद्यार्थ्यां या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
शासनाच्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षा साठी नूतन विद्यालय सेलू केंद्र होते. या परीक्षेत नूतन विद्यालयाच्या चि. सिद्धेश्वर रामेश्वर इंगळे, या विद्यार्थ्यांनी एक ग्रेड प्राप्त केला तर कु. अवंतिका मारुती आढे कु. मान्यता विलास तावरे, कु. पलश दीपक भुक्तर,कु.प्रणाली दिपक मुळे यांना बी ग्रेड प्राप्त झाला आहे. तर शाळेतील 20 विद्यार्थी या परीक्षेत सी ग्रेड प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, डॉ शरद कुलकर्णी,संस्थेचे पदाधिकारी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के के देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. परीक्षा यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर डी. कटारे कलाशिक्षक फुलसिग गावित यांनी परिश्रम घेतले.