आपला जिल्हा

शांतता रॅलीच्या माध्यमातून बुद्धविचारांचा जागर….सेलूत बूद्ध जयंती साजरी

सेलू:( प्रतिनिधी)  तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य शांतता व कँडल रॅलीचे आयोजन सोमवार १२ रोजी करण्यात आले. रायगड नाका येथून शांतता रँलीची सूरूवात करण्यात आली होती सदरिल शांतता रँली शहरातील प्रमूख रस्त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत काढलेल्या या रॅलीस पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या हस्ते धम्मध्वज फडकवून सुरुवात करण्यात आली.


या शांतता रॅलीमध्ये भन्ते प्रज्ञाबोधी, अशोक अंभोरे,मिलिंद सावंत, प्रकाश भालेराव, सिद्धार्थ एडके, सुरेश रणखांबे, सुमेध आवटे, गंगाधर अवचार , नरहरी काकडे,गजानन साळवे,प्रा. डी.एन. गायकवाड, प्रा. के. डी. वाघमारे, के.व्ही. वाघमारे,दादाराव ताजने, बळीराम चव्हाण, संजीव घोंगडे, सोनकांबळे सर,प्रकाश पाईकराव, सूर्यकांत गायकवाड,अशोक कदम , नागोराव साळवे, होसुरकर, प्रदीप जोहिरे, सूर्यकांत गायकवाड,बाळू धापसे,विनोद धापसे, रोहन आकात, संजय भाग्यवंत, कमलाकर कोल्हे, राहूल इंगळे, सिद्धार्थ शिरसाट, विजय खेबाळे,राहूल जाधव,विकास धापसे,विनोद धापसे,विक्की घायतडक यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शांतता रॅलीतून सामाजिक एकता, शांती आणि धम्म संदेश जनमानसात देण्यात आला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!