महाराष्ट्र

मराठा आरक्षणा संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री साहेब, मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांना निवेदन

जालना( प्रतिनिधी ) नुकतेच मराठा समाजाला २६ जानेवारी रोजी ओबीसीतुन आरक्षण देण्याचा राज्य सरकारने जो घाट घातलेला आहे त्याला सकल ओ.बी.सी. समाजाचा तिव्र विरोध आहे. व ज्यांचा विरोध आहे यांना आक्षेप नोंदवण्यासाठ १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीमध्ये ग्रामीण भागातील ओ.बी.सी. बांधवांना आक्षेप नोंदवता यावा म्हणुन तालुका स्तरावर आक्षेप स्विकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावेत व आक्षेप नोंदवला म्हणुन त्याची मुळ प्रत आक्षेप करणाऱ्या व्यक्तीला देण्यात यावी, नसता यामध्ये गैरप्रकार सुध्दा होऊ शकतो.

तसेच हे कक्ष शासकिय सुटीच्या दिवशी सुध्दा चालू ठेवण्यात यावेत अशी सकल ओ.बी.सी. समाजाच्या वतीने आम्ही आपल्यामार्फत मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व ओ.बी.सी. नेते ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे मागणीचे निवेदन सोमवार दि.29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना मार्फत पाठविण्यात आले.या निवेदनावर नवनाथ आबा वाघमारे,शिवाजीराव टेहळे, अंकुश मामा पवार, बाळासाहेब बोरकर, गणेशराव वाघमारे, संतोष नेमाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!