ताज्या घडामोडी
श्रीराम प्रतिष्ठान सेलू: रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न
डॉ. महादेव गव्हाणे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन: ध्येय निश्चित करा, मोठी स्वप्ने पहा!

सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान सेलूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 2024 चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रा. महेश पाटील संचालक, महाराष्ट्र इंजिनियरिंग कॉलेज, प्रमुख मार्गदर्शक डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य, राजर्षी शाहू कॉलेज, लातूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.



