आपला जिल्हा

प्रॉस्परस पब्लिक स्कूल’मध्ये रंगला ‘फेस्टिवल ऑफ इंडिया’ सांस्कृतिक महोत्सव

सेलू ( प्रतिनिधी ) दि. 26 डिसेंबर श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूल, सेलू येथे ‘फेस्टिवल ऑफ इंडिया’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची अभिव्यक्ती आणि भारतीय सण-उत्सवांची पारंपरिक झलक यांची संगम पाहायला मिळाल्याने कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व नटराज मूर्ती पूजनाने करण्यात आली. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला आणि प्राचार्य प्रगती क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून कैलास काळे, बाबासाहेब भाबट, संतोष भरदम, सुशील नाईकवाडे, शेख मुस्ताक शेख बशीर आणि कांता वानखेडे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

विद्यार्थ्यांनी भारतीय सणांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या नृत्यांद्वारे विविध सण-उत्सवांचा रंगतदार आढावा सादर केला. यामध्ये नवरात्री, रक्षाबंधन, मकरसंक्रांती, होळी, दिवाळी आणि रामायण अशा भारतीय परंपरांच्या सांस्कृतिक दर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ताठे मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक प्राचार्य प्रगती क्षीरसागर यांनी केले. आभार प्रदर्शन जाधव सरांनी केले.

कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना दाद दिली.

‘फेस्टिवल ऑफ इंडिया’ने स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण ठरवून, विद्यार्थ्यांसाठी भारतीय परंपरांचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रेरणादायी व्यासपीठ तयार केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!