आपला जिल्हा

खेळामुळे जबाबदारी ची जाणीव निर्माण होते –डॉ व्ही. के. कोठेकर

नूतन विद्यालय ,न्युज मॉर्डन इंग्लिश स्कूल सेलू , विजयी

सेलू (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानावरील खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या खेळातून आपल्या जबाबदारी ची जाणीव विद्यार्थ्यांना होते त्यातुनच यशाचा मार्ग मिळतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी केले.
क्रीडा व युवक सेवासंचालनाय पुणे, जिल्हाक्राडाधिकारी कार्यालय परभणी, पं.स.गटशिक्षणाधिकारी कार्यालय व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ता. १ सप्टेंबर रोजी येथील नूतन महाविद्यालयात आयोजित तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या प्रसंगी उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्राचार्य डॉ.उत्तमराव राठोड, प्रा.डॉ.के.के.कदम यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकुण १६ संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेस दुपार सञात गटशिक्षणाधिकारी तथा तालुका क्रीडा स्पर्धा सचिव उमेश राऊत, नायब तहसीलदार अनिकेत पालकवाड, सां.बा.उप अभियंता वाघमारे, प्रा. महेश कुलकर्णी, यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर गजानन साळवे यांनी आभार मानले.
दि. २सप्टेंबर रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर नूतन संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया व सदस्य प्रकाशचंद्र बिनायके, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड,ॲड जितेंद्र घायतडक, प्रा. खापरखुडीकर, ता.क्री.संयोजक गणेश माळवे, प्रा.आर.एन. कदम उपस्थित होते. उपांत्य फेरी सामान्य होऊन , अंतिम फेरी सामन्यात
१७ वर्षे मुलींच्या गटात:-
न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल -प्रथम, व्हिजन इंग्लिश स्कूल ने द्वितीय क्रमांक पटकावला. तर १४ वर्षे मुलाच्या गटात
न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल सेलू, (प्रथम) व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय).
१७ वर्षे मुले गटात: नूतन विद्यालय सेलू( प्रथम) न्युज मॉर्डन इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय).
पंच म्हणून कपील ठाकुर, प्रमोद गायकवाड, सुरज शिंदे, अलीम पठाण, जगदीश लहाने, विजय सोंजे, प्रशांत नाईक, मसुद अन्सारी, जुलाह खुद्दुस,संगीर फारोकी,अमर सुरवसे, लक्ष्मण सोळंके, चंद्रकांत गटकळ , लक्ष्मीकांत फटाले,अमर ठाकूर, आदी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!