आपला जिल्हा

शेतक-यांना अतिवृष्टी अनूदान मिळेना….अनूदान देण्याची दबाव गटाची मूख्यमंत्र्याकडे मागणी

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू:सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. निवडणूकी पूर्वि आपल्या सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान जाहीर कले मात्र अद्यापही अनूदान रक्कम शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली नसल्याने अनूदान रक्कम तात्काऴ शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी सेलू तालूका दबाव गटाच्यावतीने राज्याचे मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे शूक्रवार २७ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हयातील काही तालुक्यात अतीवृष्टी अनूदान रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग झाली आहे मात्र सेलू तालूक्यातील शेतकरी मात्र अनूदानाची प्रतिक्षा करत असून अनूदान रक्कम मिळाली नसल्याने नेमके कारण काय?असा प्रश्न शेतक-यांना पडला असून अनूदान कधी येणार या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून सेलू तालुक्यातील शेतक-यांना न्याय मिळेल असे सकारात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी परभणी यांना तात्काळ द्यावेत अशी मागणी करण्यात आली असून यासाठी सेलू तालूका दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर ओमप्रकाहा चाव्हाळ, इसाक पटेल
अँड. टी. ए. चव्हाण, नारायण पवार गुलाब पोळ,सतिश काकडे, आबासाहेब भुजबळ, उदय सोळंके,गणेश सोळंके, मुकुंद टेकाळे, दिलिप मगर, विलास रोडगे, अँड. देवराव दळवे, अँड. योगेश सुर्यवंशी, अँड-पांडुरंग आवटे,लक्ष्मण प्रधान, रामचंद्र आधाव, भारत रवंदळे, दत्ता कांगणे,अजित मंडलीक, गणपत मिटकरी, मोहन खापरखूंरीकर आदींनी पूढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!