आपला जिल्हा

सेलूत त्वचेला पूर्व सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या पेशींचे यशस्वी प्रत्यारोपन

पांढऱ्या कोडाच्या 58 शस्त्रक्रिया यशस्वी, मराठवाड्याच्या बाहेरील अनेक रुग्णांनी घेतले उपचार

सेलू (प्रतिनिधी ) त्वचेवरील पांढरा कोड किंवा पांढऱ्या डागावर आता सेलू शहरातही उपचार उपलब्ध झाले असून त्वचेला पूर्व सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या पेशींचे यशस्वी प्रत्यारोपन केले जात आहे.

ज्या रुग्णांच्या त्वचे वरील पांढऱ्या कोडाचे डाग औषधोपचाराने वाढत नाहीत ,असे न वाढणारे पांढरे डाग-चट्टे कायम स्वरूपी नष्ट करता येतात. त्या साठी
” *नॉन कल्चर एपिडरमल मेलेनोसाईड सेल सस्पेन्स टान्सफर”* ही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी असून तीचा अवलंब करून 8 रुग्णांवर यशस्वी पणे त्वचा प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच
*सक्शन ब्लिस्टर ग्राफ्टींग, पंच ग्राफ्टींग, स्प्लीट थिकनेस स्कीन ग्राफ्टींग* या उपचार पध्दती देखील प्रभावी व परिणामकारक ठरल्या असून त्याचा 50 रुग्णांना लाभ झाला आहे. या सर्व उपचार पद्धतीने मागील दोन वर्षात आतापर्यंत एकुण 58 रुग्णांवर त्वचेला पूर्व सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या पेशींचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले असल्याची माहिती येथील प्रसिद्ध *मायस्कीन हॉस्पीटल चे त्वचाविकार तज्ञ डॉ.शैलेश मालाणी व डॉ.योगिता मालाणी* यांनी दिली. विशेषतः 15 ते 45 वयोगटातील रुग्णांना या उपचार पध्दतीचा मोठा लाभ होत असून हे उपचार घेण्यासाठी मराठवाड्या बाहेरील अनेक रूग्ण सेलूत येत आहेत. सेलू व परभणी जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही उल्लेखणीय सेवा असून अनेक रुग्णांचे नैराश्य पूर्ण जीवन पुन्हा इंद्रधनुष्या प्रमाणे सप्तरंगाने बहरणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!