आपला जिल्हा

छत्रपती शाहू महाराज करिअर मेळाव्यात विविध निवड, योजनेची माहिती

कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी (आयटीआय) यांच्या वतीने

परभणी, दि. 24 (प्रतिनिधी ): कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी (आयटीआय) यांच्या वतीने नुकतेच ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबीर’ समुपदेशन मेळाव्यात विविध उमेदवारांची निवड आणि योजनेची माहिती देण्यात आली.

मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या वतीने विविध महामंडळाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा उद्योग केंद्र, परभणी आणि विविध कंपनीचे डीएम एटरप्रायझेस औरंगाबाद, एल अँड टी सीएसटीआय इन्स्टिट्यूट पनवेल, क्वीज कॉर्पोरेशन लिमीटेड पुणे, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया (रेस्टी) इत्यादी आकर्षक स्वरुपातील स्टॉल मांडण्यात आले होते. या स्टॉलला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच विविध कंपनीमध्ये ११७ उमेदवारांची निवड करण्यात आली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!