आपला जिल्हा

विज्ञान नाट्योत्सवात नूतन विद्यालयाचे यश

सेलू ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्यालयातील सहशिक्षक सुरेश हिवाळे लिखित आणि अश्विनी केंद्रे दिग्दर्शित ‘ अंधश्रद्धा दूर करू…. प्रगतीची वाट धरू ‘ या नाटकाला गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलूच्या वतीने बुधवार ( दि. ०६ ) रोजी रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात तृतीय क्रमांक मिळाला.

या नाटकात अक्षरा शिंदे, शिवानी शिंदे, ग्रिष्मा ठाकूर, ऋतुजा राऊत, प्रतिक्षा वानरे, प्रणाली मुळे, अक्षरा बोकण, श्रीनिवास देवकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बक्षीस वितरण कार्यक्रमास नाट्य स्पर्धेचे परीक्षक रवी मुळावेकर, पद्महास पटेल, रेवणअप्पा साळेगावकर, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, सुरेश हिवाळे यांची उपस्थिती होती. नाटकास तृतीय क्रमांक मिळल्या बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, देवीदास सोन्नेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनात अंजली पद्माकर, सुनीता काळे, विजय चिट्टे, रमेश मरेवार यांनी पुढाकार घेतला. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन जनार्धन कदम यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!