आपला जिल्हा

मारुती नगर मधील सिमेंट रोडच्या कामाचे मा. आ. हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते भूमिपूजन

सेलू ( प्रतिनिधी ) शेलू शहरातील मारुती नगर मधील सिमेंट रोडच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते झाले.

यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे, संदीप भैय्या लहाने, नगरसेवक अविनाश शेरे, बंडू देवधर यांची उपस्थिती होती.
मारुती नगर मध्ये अनेक वर्षापासून रोड व नाल्यांसाठी नागरिकांमध्ये फार असुविधा जाणवत होती यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या समस्यांची जाण घेऊन माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी पुढाकार घेऊन लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.


यावेळी मारुती नगर मधील रहिवासी मोहन राजे बोराडे, दत्तराव आढळकर, किशोर कटारे,जिजाभाऊ डख, चव्हाण सर, शेरे सर, मोगल सर, सचिन मोरे, हमीद भाई,आदि सह मारुती नगर मधील रहिवाशांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!