आपला जिल्हा
हेमंतराव आडळकरांच्या सर्वोत्कृष्ट चेअरमन’ पुरस्काराने साईबाबा बँकेची राष्ट्रीयस्तरावर नोंद.
पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे प्रतिपादन.

सेलू (प्रतिनिधी) सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँक विस्तार, तंत्रज्ञान व आधुनिक व्यवस्थापन प्रणाली यातून वेगळेपण सिद्ध केल्याची दखल घेऊन दिल्ली येथील प्रमोटिंग अचिव्हमेंट फाउंडेशनच्या अत्यंत मानाचा सर्वोत्कृष्ट चेअरमन परफॉर्मन्स अॅवॉर्ड २०२३ या पुरस्कारासाठी निवड झाली. यामुळे साईबाबा बँकेच्या प्रगतीची राष्ट्रीयस्तरावर नोंद झाली आहे.असे मत पाथरी बाजार समीतीचे सभापती तथा वाल्मिकी बँकेचे चेअरमन अनिलराव नखाते यांनी व्यक्त केले.




