आपला जिल्हा

संविधान प्रत विटंबना प्रकरणी त्या व्यक्तीवर देशद्रोहीचे गुन्हे दाखल करुन कठोरात कठोर शिक्षा देण्याची सेलूत मागणी

सेलू शहर बंद ठेवत सेलू तहसीदार यांना निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोरील संविधानाची प्रतिमा उचलून रोडवर फेकून दिल्या बाबत आज सेलू तहसीदार यांना निवेदन देऊन संविधान प्रत विटंबना प्रकरणी त्या व्यक्तीवर देशद्रोहीचे गुन्हे दाखल करुन कठोरात कठोर शिक्षा देण्याची सेलूत मागणी करण्यात आली तसेच सेलू शहर बंद ठेऊन घटनेचा निषेध करण्यात आला.

सेलू तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात 10/12/2024 रोजी परमणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर ठेवलेल्या संविधानाची प्रतिमा सोपान दत्तराव पवार रा. मिर्झापूर ता.जि. परभणी या व्यक्तीने उचलून रोडवर फेकून दिली आहे. या व्यक्तीवर देशद्रोहीचे गुन्हे दाखल करुन त्यास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच या देशद्रोही व्यक्तीच्या पाठीशी कोणती जातीवादी व देशद्रोही शक्ती आहे याची चौकशी करुन त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावी. या मागणी साठी आज दि.11/12/2024 रोजी सेलू शहर कडकडीत बंद करण्यात येईल याची सर्व व्यापाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे हि विनंती.
या निवेदनावर डॉ.आंबेडकर प्रेमी नागरिक तसेच मिलिंद सावंत ऍड विष्णू ढोले,अशोक पाईकराव,प्रदीप धापसे, शुभम खंदारे, अनिल डांबाळे, बापू धापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!