आपला जिल्हा
आठवडी बाजार सेलू येथील अतिक्रमणाबाबत कार्यवाही ची मागणी
चौकशी करुन संबंधीतावर कडक कार्यवाही करण्याची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू येथील आठवडी बाजार येथे बऱ्याच दुकान मालकांना नगर परिषदेकडून दुकान जागा वापरण्यास दिलेली आहे.
यामध्ये संबंधीत दुकानदारांनी नगर परिषदेने दिलेल्या दुकान जागेच्या बाहेर परस्पर आपल्याला विश्वासात न घेता बांधकाम करुन अतिक्रमण केलेले आहे. या संबंधीत आपल्या कार्यालयाकडून अतिक्रमण काढण्याबाबत सुचना दिलेला आहे.
नगर परिषद कार्यालयाकडून संबंधीत दुकानदाराना सन 2012 पासून ते आजपर्यंत दुकान जागा वापरण्यास दिलेली आहे. यामध्ये नगर परिषदेची दिशाभूल करुन अतिरिक्त जागा घेऊन अतिक्रमण करण्यात आलेले आहे.




