आपला जिल्हा

*विधानसभा निवडणुकीसंदर्भातील वक्तृत्व स्पर्धेत क्षितिजा खजिने हिचे यश

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी जिल्हा मतदान जनजागृती अभियान (SVEEP) यांच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलूची विद्यार्थिनी क्षितिजा कैलास खजिने हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शालेय गटातून स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून क्षितिजा हिने शाळेचे आणि शिक्षकांचे नाव उंचावले आहे. तिच्या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे,शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर शिक्षक, आणि मित्रपरिवाराने अभिनंदन केले.

क्षितिजाच्या या यशाने तिच्या मेहनतीचे फळ आणि वक्तृत्व कौशल्याला एक नवीन ओळख मिळाली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!