आपला जिल्हा

सेलूत मतदार जनजागृती निमित्त बाईक रॅली

सेलू ( प्रतिनिधी ) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावंडे,जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण फुलारी,तहसीलदार डाॅ.शिवाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने मतदार जागृती निमित्त (ता.१६) शनिवार रोजी बाईक रॅली काढण्यात आली.

रॅलीची सुरुवात गटशिक्षणाधिकारी कार्यालया पासून
नूतन रोड जिंतूर नाका,बस स्टॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड, मठगल्ली चौक,बाजार रोड सारंगी गल्ली,सुरज मोहल्ला, पारधी वाडा,जवेरी गल्ली,कुंभार गल्ली नाला रोड,फुलारी गल्ली,वकील गल्ली, शेरे गल्ली,गणपती गल्ली,लोकमान्य टिळक पुतळा,बाबासाहेब मंदिर रोड मौलाना आझाद नगर, श्रीनगर,विद्यानगर,नूतन महाविद्यालय रोड रायगड कॉर्नर रायगड कॉर्नर ते बस स्टॅंड रोड अशी काढून गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील मैदानावर समारोप करण्यात आला.यावेळी गटशिक्षणाधिकारी तथा
तालुका स्वीप नोडल अधिकारी उमेश राऊत यांनी उपस्थितांना मतदार जागृती निमित्त मार्गदर्शन केले व बाईक रॅलीत उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी
सहाय्यक नोडल अधिकारी रमेश मरेवार,मनोज देगावकर केंद्र प्रमुख विजय चिकटे,विष्णू डोंबे,शरद ठाकर,रंजय बारडकर आणि तालुक्यातील जिल्हा परिषद व विविध संस्थांच्या शाळेतील शिक्षक बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!