आपला जिल्हा

राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरचे वर्चस्व

सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल व ऑल महाराष्ट्र वूशु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय 21वी सब ज्युनिअर व 22 ज्युनिअर /युथ मुले मुली राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सुमारे 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

तावलू या क्रीडा प्रकारामध्ये सब ज्युनिअर गटातून प्रथम मुंबई सिटी द्वितीय कोल्हापूर व तृतीय नागपूर. तर ज्युनिअर गटामध्ये प्रथम पुणे, द्वितीय ठाणे व तृतीय कोल्हापूर.

सांसु या क्रीडा प्रकारात सब जुनिअर गटातून प्रथम संभाजीनगर, द्वितीय धुळे व तृतीय नागपूर. तर जूनियर गटातून प्रथम छत्रपती संभाजीनगर, द्वितीय नागपूर व तृतीय पुणे यांनी मिळविला.

विजेत्या संघास कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी जिल्हा वूशु असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, एस.एस. कटके महासचिव ऑल महाराष्ट्र वूशु असोसिएशन, डॉ. ऋतुराज साडेगावकर, प्रकाश बप्पा गजमल, संजय गटकळ, बद्री बरसाले, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षीरसागर, प्रा. अशोक बोडखे, प्रा. अक्षय बन, प्रा. गजानन जाधव डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, श्रीपाद रोडगे यांच्या हस्ते सन्मान करून बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश काळे गणेश सोनार, ज्ञानेश्वर गव्हाणे, राजेंद्र देशमुख, विशाल उजगरे, मोहकरे, गुनाजी फंड, गजानन जाधव सर, किरण कुमार पुंडकरे, वैभव शिखारे, संदीप जोगदंड, अमोल भुजबळ, रोहिणी आडसकर, सीमा काळे, रवी रोडगे, कपिल ठाकूर राजरत्न खरे, तेजस कापुरे, गणेश दिवटे, कांबळे मुंजा, सचिन मानवतकर, सगुण गायकवाड, कैलास ताठे, भगवान घुगे, राजू जाधव, शुभम पवार, प्रमोद गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन श्री. डिगांबर टाके व आकात यांनी केले तर आभार कार्तिक रत्नाला यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!