आपला जिल्हा

मानवत शहरात निवडणूक काळात पाचशे रुपयाच्या नकली नोटांचा सुळसुळाट…..

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मानवत शाखेत उघडकीस आला प्रकार

मानवत ( प्रतिनिधी) मानवत शहर तथा तालुक्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या धामभूमीत मानवत शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी भगवान दगडू यांच्याकडे पाचशे रुपयाची एक नकली नोट त्यांच्याकडे आली. आज भगवान दगडू हे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले असताना नोटा मोजण्याच्या यंत्राने नकली नोट बाजूला फेकल्याने ही घटना उघडीस आली.

कोना मार्फत या नोटांचा वापर होत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. निवडणूकित मतदारांना लुभावाण्या साठी कदाचित ही पाचशेची नोट आली असावी अशी नागरिकांतून चर्चा आहे. मतदारांनी व नागरिकांनी याबाबत काळजीपूर्वक लक्ष द्यावे नसता ज्यांच्याकडे पाचशेच्या नोटा सापडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मानवत बाजारात 500 ची नकली नोट आल्याने व्यापाऱ्यात खळबळ उडालेली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!