आपला जिल्हा

प्रा. लक्ष्मण हाके,  नवनाथ वाघमारे  यांच्यावर भ्याड हल्याचा सेलुत ओबीसींच्या वतीने निषेध

ओबीसी समाज बांधव सेलूच्या वतीने सेलू उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये पाचोडी गावात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराचा प्रचार करताना प्रवासादरम्यान अचानक काही शेकडो समाजकंटक कार्यकर्त्यांनी ओबीसी नेते प्रा.  लक्ष्मण हाके  व  नवनाथ आबा वाघमारे यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला करून त्यांच्या प्रवासात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्व ओबीसी समाज बांधव सेलूच्या वतीने सेलू उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.
निवडणूक प्रचारात लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण उत्सवांमध्ये असे असंविधानिक कृत्य करणाऱ्या समाज कंटक व्यक्तींना तत्काळ अटक करून शासनाने कडक कायदेशीर कार्यवाही करावी, जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही अशी सर्व ओबीसी समाज बांधव सेलूकडून मागणी करण्यात आली.
तरी संबंधित घटनेत सहभागी असलेल्या समाजकंटक व्यक्तींना तत्काळ अटक करून शासकीय कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. नसता ओबीसी समाज बांधवात तीव्र असंतोष आसून भविष्यात अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सेलू ओबीसी समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी निवेदनावर गणेश अण्णा नाईकवाडे, माऊली थोरात, महादेव गायके, विनोद शिंदे, मनोज गोरे, विजय दळवे, प्रभाकर इंगळे, रामचंद्र दळवे, माणिक शिंदे, मधुकर नजान, मदन मोगरे, सुदाम भाऊ धोत्रे, सदाशिव पवार, ज्ञानेश्वर काळे, विनायक पडूळे, राजेंद्र गाडेकर, ज्ञानेश्वर काळे, आकाश भिसे, भगवान चव्हाण, सुदर्शन हातकडके, माऊली काळे, कुणाल सोनटक्के, सचिन राऊत, राजेश पडूळे, कारके शिवाजी, रामेश्वर पांचाळ, ब्रह्मा कारके, विश्वनाथ गणगे, अशोक गिनगिने, उत्तम लोखंडे, प्रीतम महाजन, पांडुरंग कटारे, मारुती कटारे, नारायण डुकरे, दत्तराव अबुज, नायबराव कटारे, राजाराम डुकरे, दिगंबर बुधवंत, दौलत माने, दुर्गादास आळसे, पंडित जगाडे, प्रीतम महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!