आपला जिल्हा

निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा यांची नियुक्ती

परभणी, दि. 23 ( प्रतिनिधी ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ, 96- परभणी विधानसभा मतदारसंघ 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ -98, पाथरी विधानसभा मतदारसंघांकरीता राहूल मिश्रा (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक निरिक्षक (खर्च) राहूल मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 8180071814 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत राहूल मिश्रा यांचा मुक्काम सावली, शासकीय विश्रामगृह, परभणी येथे असणार आहे. त्यांना भेटण्याची वेळ दुपारी 4.00 ते सांयकाळी 6.00 वा. अशी आहे. निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नियंत्रक पि.डी. निर्मळ, भ्रमणध्वनी क्रमांक 9423324809 यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!