आपला जिल्हा

जिंतूर विधानसभा मेघना बोर्डीकर सह 5 उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र केले दाखल

परभणी, दि. 23 (प्रतिनिधी ) :- आज बुधवार, दि 23 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे-

95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 6 उमेदवारांनी 6 अर्ज घेतले. तर ज्ञानेश्वर देविदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पार्टी), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 25 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले.

97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 32 उमेदवारांनी 50 अर्ज घेतले. तर रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

98- पाथरी विधानसभा मतदारसंघ – 20 उमेदवारांनी 48 अर्ज घेतले तर भास्कर रामकिसन बेदरे (अपक्ष) व त्रिंबक देविदास पवार (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

(संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!