आपला जिल्हा

जिंतूर, परभणी, पाथरी विधानसभा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल 

परभणी , दि. 22 (प्रतिनिधी ) :- आज मंगळवार, दि 22 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे-

1) 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 18 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर दिनकर धारोजी गायकवाड यांनी बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले.

2) 96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 21 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर अ. पाशा अ. गफ्फार खुरेशी यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले.

3) 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 17 उमेदवारांनी 27 अर्ज घेतले.

4) 98- पाथरी विधानसभा मतदारसंघ – 18 उमेदवारांनी 52 अर्ज घेतले तर अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

(संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

Related Articles

Back to top button
Don`t copy text!