आपला जिल्हा
सेलूत सामूहिक रामरक्षा पठणात 3500 विद्यार्यांचा सहभाग
राष्ट्रसंत श्री गोविंद देव गिरीजींची उपस्थिती* *गिता परिवार व समर्थ & गजानन अँग्रोचे आयोजन

सेलू ,( प्रतिनिधी ) येथील गीता परिवाराच्या वतीने समर्थ ऍग्रो इंडस्ट्रीज परिसरात सामूहिक रामरक्षा पठणात रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध शाळेसह ग्रामीण भागातील शाळेतील ३५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

राष्ट्रसंत श्री गोविंद देव गिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम कथेचे संयोजक विजयकुमार बिहाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराचे मराठवाडा प्रमुख लक्ष्मीकांत करवा, सचिव संगीता तिवारी, महेशराव खारकर, रामेश्वरजी राठी, हरिकिशनजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार सादर केले. नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी डी सोन्नेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतमय योगासनासह सूर्यनमस्कार सादर केले ,तसेच प्रभू रामचंद्रांच्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीतापठण केले. सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने विविध देशभक्तीपर गीते सादर करून स्वामीजींसह उपस्थितांची दाद मिळवली.
यानंतर नूतन विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल ,स्वामी विवेकानंद विद्यालय ,न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ,शारदा विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, नूतन प्राथमिक विद्यालय, पोदार इंग्लिश स्कूल, यशवंत प्राथमिक विद्यालय, न्यू हायस्कूल, केशवराज बाबासाहेब विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, ज्ञानतीर्थ विद्यालय, यशवंत जिल्हा परिषद प्रशाला, व लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल आदी विद्यालयालयातील ३५०० मुला- मुलींनी सामूहिक रामरक्षा पठण करून स्वामीजीसह उपस्थितांकडून दाद मिळवली .
भारत देशावर प्रेम करा…स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज




