आपला जिल्हा

सेलूत दम्याच्या २७० रूग्णांना मोफत औषधी वाटप* *श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी )येथील श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळा श्री रामजी भांगडीया रूग्ण सेवा मंडळ व विजय मेडिकल सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी आश्विनी पौर्णिमेच्या निमित्ताने दम्याच्या २७० रूग्णांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.

प्रतिवर्षा प्रमाणे दादू पंथी मठ गो शाळेच्या वतीने दम्याच्या रुग्णांना मोफत औषधी वाटप केले जाते. याही वर्षी या सामाजिक आरोग्यदायी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. गाईचे दुध ,बैद्यनाथ कंपनीची औषधी ,मुळ्याची भाजी,मातीचे पात्र ही सर्व औषधी सामग्री प्राप्त करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर, जालना,परभणी ,गंगामसला,पाथरी, येथील रूग्णही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.भगवान महाराज बोरूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनारायण मालाणी, सुरेंद्र तोष्णीवाल,राजेंद्र करवा, जगन्नाथ पवार,सूर्यकांत जाधव,बबलू दायमा,कृष्णा काटे,पापाजी काबरा, गोविंद शेलार,गणेश भागडे,अशोक शेलार, श्रीनिवास टाक, गोविंद गाढवे,रामा शेलार, भगवान पावडे,आनंद सोनी,दिपक पवार, आदींनी परीश्रम घेतले.
*गोळ्या बंद झाल्या*
आम्ही मागील दोन वर्षा पासून कोजागिरी पौर्णिमेला येथील गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेतील औषधी घेतो आम्हाला दम्याचा खुप त्रास होत असे परंतु येथील औषधी सेवन केल्यामुळे आमचा दम्याचा त्रास कमी झाला असून नियमितपणे घ्याव्या लागणारया गोळ्या देखील बंद झाल्या ऐवढी ही औषधी प्रभावी आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी नगर येथील सौ जया जनार्दन कोल्हे, प्रिया गोकुळ सुर्यवंशी, तसेच सौ मंगल कुलकर्णी, अमित कुलकर्णी (सेलू), सुधाकर बाबाराव लिपने, लक्ष्मण माने अंबादास जाधव, इंदुमती भास्करराव कुलकर्णी (गंगामसला) यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!