आपला जिल्हा

कामगारासह त्यांच्या कुटुबांचे जिवनमान उंचविण्यासाठी कटीबद्ध -आमदार मेघना साकोरे बोर्डीकर

सहा हजार कामगारांना संसार उपोयोगी साहित्याचे वाटप.

सेलू ( प्रतिनिधी ) :स्व:ताचा जिव धोक्यात घालुन बांधकाम कामगार काम करत असतात त्यांची सुरक्षा व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे जिवनमान उंचविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केले.त्या गुरूवार ३ रोजी आयोजीत कृषी महाविद्यालय येथे बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप प्रसंगी केले.यावेळी डाँ.संजय रोडगे,मा. उपनगराध्यक्ष संदीप लहाने तालुकाध्यक्ष अँड.दत्तराव कदम,शहराध्यक्ष अशोक अंभोरे,माऊली ताठे,रवि डासाळकर,कपिल फुलारी,गणेश काटकर आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्यातील सहा हजार बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप करण्यात आले असुन कामगारांची सुरक्षेची जबाबदारी आमदार या नात्याने साभांळणार असल्याचे ही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना तीन कार्यक्रमातून संसार उपयोगी साहित्याचे वाटप करतांना आनंद होत आहे.शासकिय योजना तळागळातील घटकापर्यंत पोहचत असल्याचे समाधान ही वाटत आहे. मतदार संघातील लाभार्थी शासकीय योजनापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेत शासनस्तरावरून सर्व योजना प्रभावीपणे मतदार संघात राबविल्या जात आहेत.
परिश्रम करणारे बांधकाम कामगार जीव मुठीत ठेऊन काम करतात. अशा कामगारांना संसार उपयोगी साहित्य मिळाले पाहिजे, या भावनेतून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळांनी ही योजना हाती घेतली आहे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवुन देण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पूढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!