आपला जिल्हा

नाफेडमार्फत मुंग, उडिद, सोयाबीनची खरेदी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

परभणी , दि. 3 (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुंग, उडिद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात आली असुन प्रत्यक्षात मुंग, उडिद खरेदी ही दिनांक 10 ऑक्टोबर 2024 आणि सोयाबीन खरेदी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोनही केंद्रीय नोडल एजन्सीना खरेदीकरीता जिल्हयांची विभागणी करुन दिलेली आहे. ती खालीलप्रमाणे
केंद्रीय नोडल एजन्सीचे नांव- नाफेड, जिल्हयाला मंजुर खरेदी केंद्र संख्या – परभणी (8) मंजूर खरेदी केंद्र – 1) परभणी तालुका सह खरेदी विक्री संघ (खरेदी केंद्र,परभणी) 2) जिंतुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग सह सो.लि. जिंतुर (खरेदी केंद्र,जिंतुर) 3) पूर्णा तालुका सह खरेदी विक्री संघ पूर्णा (खरेदी केंद्र, पूर्णा) 4) मानवत तालुका सह खरेदी विक्री संघ मानवत (खरेदी केंद्र मानवत) 5) स्वस्तिक सुशिक्षित बेरोज. सेवा सह संस्था (खरेदी केंद्र, पाथरी) 6) स्वप्नभुमी सुशिक्षित बेरोज, सेवा सह संस्था (खरेदी केंद्र, सोनपेठ) 7) तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म.बोरी (खरेदी केंद्र, बोरी) 8) तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म.बोरी (खरेदी केंद्र, सेलु)
नाफेड कार्यालयाने 19 जिल्हयातील 146 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. तसेच एनसीसीएफ कार्यालयाने 7 जिल्हयांतील 63 खरेदी केंद्राना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे राज्यात एकुण 209 खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात आली असुन त्यांच्या मार्फत शासनाने निच्छित केलेल्या कालावधीत मुग, ऊडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना हि शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. यामुळे सर्व शेतक-यांनी मुग, उडीद व सोयाबीन विक्री करीता आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुण घ्यावी व आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानतंर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत-जास्त शेतक-यांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, उपाध्यक्ष रोहीत दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे पाटील (भा.प्र.से) सरव्यवस्थापक श्री. देवीदास भोकरे यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!