आपला जिल्हा

माणसाच्या अंगी असलेली कला स्वतःची ओळख निर्माण करते – चित्रकार घुंबरे

कै. श्रीरामजी भांगडिया रजत जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

सेलू ( प्रतिनिधी ) विज्ञान भौतिक शोध लावतो पण कला माणसाला स्वतःची ओळख निर्माण करून देत, स्वतःची ओळख निर्माण करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन कलाशिक्षक तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार सुशील घुंबरे यांनी केले.

ते श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती निमित्त आयोजित चित्रकला /रंगभण स्पर्धेच्या बक्षीस वितरण मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृह नूतन कन्या प्रशाला येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


व्यासपीठावर नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस एम लोया, सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सुभाष बिराजदार, ललिता गिलडा, मुख्याध्यापक संतोष पाटील, सौ निशा पाटील, स्पर्धा संयोजक आर डी कटारे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना घुंबरे म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय आभ्यासाबरोबर कलेची साथ सातत्याने ठेवावी. शिक्षण जगायला शिकवते तर कला कसे जगावे हे शिकवते म्हणून कलेशी नाळ कायम ठेवा.

या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शासकीय रेखाकला परीक्षा 2025-26 मध्ये ए ग्रेड प्राप्त 92 विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले.
पूजा महाजन व त्यांच्या संचाने स्वागत गीत गायले.
विद्यार्थी व पालकांच्या वतीने सौ कीर्ती राऊत, सानवी शितळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आरती कदम यांनी केले तर आभार चित्रकला विभाग प्रमुख आर.डी कटारे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कलाशिक्षक फुलसिंग गावित, भगवान देवकते, सुशील कुलकर्णी, सु. ल. जोशी, उमेश क्षीरसागर,नंदकिशोर चव्हाण, कुंभार एल एम. सुजाता रासवे, पांडुरंग पाटणकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!