आपला जिल्हा

सेलू प्रीमियर लीग चे पोलीस उपनिरीक्षक कवाळे यांच्या हस्ते उदघाटन 

सेलू ( प्रतिनिधी ) 26 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत एस पी एल चे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे,यांच्या हस्ते झाले या वेळी माजी नगराध्यक्ष.विनोद बोराडे,प्रभाकर सुरवसे,मारोती चव्हाण,मिलिंद सावंत, लोकुलवार अण्णा,वहिद अन्सारी,रमेश दौड, शेख कासिम ,सचिन कोरडे,सुरेश काळे,व्यंकट चव्हाण,राजेंद्र पवार,प्रकाश पवार,वल्लभ राठी, सुनील गायकवाड, लक्ष्मण बोराडे,लक्ष्मण बुरेवार,बबन गायकवाड,बालाजी सरकाळे,जनाआबा सोळंके,सुभाष चव्हाण,आप्पू सोळंके,मनोज दीक्षित,संतोष बेंडे,राजू रोडगे आदींची उपस्थिती होती.

पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला,उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आयोजित केले होते यामधे डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांच्यात सामना खेळवण्यात आला.यावेळी डॉ.असोसिएशनचे डॉ.परेश बिनायके वकील संघाचे अध्यक्ष एड.बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसिएशनचे श्री संदीप टाक त्यांच्या टीमसह उपस्थित होते,
मॅचेस नंतर त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले, नंतर लीग ला सुरुवात करण्यात आली.
या लीग चे प्रथम पारितोषिक रु51000 हजार व भव्य 5 फूट ट्रॉफी व द्वितीय पारितोषिक रु 21000 व भव्य 4 फूट ट्रॉफी विजेत्यांना देण्यात येणार आहे.
सेलूतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना मोठ व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या लीग चे आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष साईराज बोराडे यांनी दिले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!