आपला जिल्हा

श्रीराम कथेची सेलूत जय्यत तयारी सुरू…विविध समित्यांचे गठण

राष्ट्रसंत स्वामी गोविन्ददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून १५ ऑक्टोबरपासून कथा

सेलू  ( प्रतिनिधी ) अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविन्ददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथे १५ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत श्रीराम कथा आयोजन करण्यात आले आहे. या भव्य आयोजनाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून समित्यांच्या बैठकांमधून कथेच्या यशस्वी आयोजनावर भर देण्यात येत आहे.

 

कथेच्या निमित्ताने मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारी, १५ ऑक्टोबर ते बुधवारी, २३ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. कथास्थळ ‘हनुमानगढ’ नूतन विद्यालयामागील क्रीडांगण सेलू,जि.परभणी (महाराष्ट्र) आहे. दरम्यान, सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्रद्धेय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भजनसंध्या आहे. कथा श्रवणासाठी इष्टमित्र परिवारासह अगत्यपूर्व उपस्थित राहावे, असे आवाहन जयप्रकाश विजयकुमार बिहाणी आणि बिहाणी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

विविध समित्यांचे गठण

श्रीराम कथेच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच जास्तीत जास्त भाविकांना कथा श्रवणाचा लाभ मिळावा, यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये स्वागत समिती, शोभा यात्रा आणि ग्रंथ दिंडी, पेंडाल आणि स्टेज डिकोरेशन, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था, भजन संध्या नियोजन, दैनिक स्वछता, कार्यालय समिती, प्रचार आणि प्रसार समिती आणि दैनिक पूजा,उत्सव समितीचा समावेश आहे. सर्वच समित्यांच्या बैठकांमधून नेटके नियोजन व आयोजनावर भर देत तयारीचा आढावा घेतला जात आहे.

समस्त सेलूकरांचा आनंदोत्सव राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून १५ ऑक्टोबरपासून ९ दिवस पंचक्रोशीतील भाविकांना श्रीराम कथा श्रवणाचा अलभ्य लाभ मिळणार आहे. प्रभु श्रीरामचंद्रांचा हा उत्सव म्हणजे समस्त सेलूकरांचा आनंदोत्सव आहे. सर्वांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या अपूर्व श्रीराम कथा सोहळ्यात सहभागी होऊन कथा श्रवणाचा लाभ घ्यावा. – जयप्रकाश विजयकुमार बिहाणी, आयोजक, श्रीराम कथा, हनुमानगढ, सेलू जि.परभणी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!