आपला जिल्हा

इतर मागास बहुजन कल्याणच्या योजनेतून विद्यार्थांना करीअरची संधी – तहसीलदार डाँ. शिवाजी मगर

ईतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती मेळावा.

सेलू ( प्रतिनिधी ) ओबीसी ,व्हिजेएनटी,एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणीक विकास घडवून त्यांचे ज्ञान संवर्धनासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग उत्तमपणे कार्यरत आहे.विद्यार्थांना करिअर करण्याची हि एक प्रकारे संधी आहे.याशिवाय ता घटकातील नागरीकांनीही आपले जिवनमान उंचावण्यासाठी या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी केले.

ईतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती मोहीम सहाय्यक संचालक गिता गुठ्ठे यांचे सनियंत्रणात तालकास्तरावर राबविली जात आहे. शुक्रवारी सेलू येथील नुतन विद्यालय सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे,प्राचार्य उत्तम राठोड,इतर मागास बहुजनचे निरीक्षक तुकाराम भराड,ओबीसी महामंडळचे निरीक्षक रवी दशरथे,गणेश जाधव,गंगाधर भुसारे ,रमेश मरेवार यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना तहसीलदार डॉ.शिवाजी मगर म्हणाले की, विमुक्त जाती व भटक्या जमाती व ईतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी व नागरीकांचे जिवनमान उंचावे यासाठी हा स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला आहे. यामध्ये मँट्रीकपुर्व पासुन मँट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसह परदेशात मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना संधी आहे. या विभागातील नाविण्यपूर्ण योजनेत आपण स्वतः, आपले कुटुंब व आपल्या गावातील घटक लाभार्थी बनले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मगर यांनी केले.तर गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे यांनी बोलतांना सांगितले की,योजनां भरपूर आहेत. पण त्या मिळविण्यासाठी प्रत्येक योजनेच्या अटी शर्थी ची माहिती जाणून घेणे व याची परीपूर्णता करून योजनेपासून कोणीही वंचित राहू नये अशी मोहीम इतर मागास बहुजन विभाग विभागाने हाथी घेतली आहे. या संधीचा सर्व घटकातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंडे यांनी केले.यावेळी ओबीसी महामंडळाचे निरीक्षक रवी दशरथे यांनी ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत बिज भांडवल,थेट कर्ज योजना,बिनव्याजी कर्ज योजना,गटकर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना त्यांचे स्वरूप व निकष याबद्दल सविस्तर माहिती दिली.गंगाधर भुसारे यांनी जिल्हास्तरीय पदवी व त्यापुढे शिक्षण घेणाऱ्या मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह,व्हिजेएनटी आश्रमशाळा, विद्यानिकेतन पब्लिक स्कुल कमळेवाडी, कन्यादान, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना,धनगर मुलांसाठी नामांकित इंग्रजी शाळा,मोदी घरकुल योजना,वयोवश्री व तिर्थदर्शन योजना अशा विविध योजनेची सविस्तर माहिती दिली.सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले.भगवान पल्लेवाड यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी प्राचार्य रमेश नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, निलेश गडम,योगेश गिराम,भगवान पल्लेवाड, बालाजी मुळे बाळू गोरे,भागवत चोपडे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!