सेलू ( प्रतिनिधी ) चिडीमार पथक स्थापन करून अल्पवयीन जोडप्यांवर कार्यवाही करा व सेलू बसस्थानकावर कायम एक पोलिस कर्मचारी देन्याची मागणी पोलिस निरीक्षक सेलू यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात सेलू शहर व परिसरात शाळा, महाविद्यालय, अभ्यासिका या ठिकाणी छेडछाडीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे मुलींना त्रास होत आहे. सध्या नवरात्र असल्यामुळे महिला व तरुणी दर्शनासाठी व दांडियासाठी जात आहेत. त्यांना पण टवाळखोरांचा त्रास होत आहे. तसेच सेलू व परिसरात अल्पवयीन जोडप्यांचे प्रमाण पण वाढले आहे. यामुळे लहान लेकरांवर वाईट परिणाम होत आहेत. या गोष्टीमुळे लहानसा भांडणाचे प्रकार घडत आहेत. भविष्यात एखादी मोठी अप्रिय घटना घडू नये. यासाठी तात्काळ या टवळखोरांचा व अल्पवयीन जोडप्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. सेलू बस स्थानक व परिसरात छेडछाडीचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे सेलू बस स्थानकावर कायम एक पोलीस कर्मचारी ठेवण्यात यावा. तसेच या टवळखोरांना कडक शासन करण्यात यावे. नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी जयसिंग शेळके, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके, गणेश शेवाळे, लालू खान, आकाश इघवे, गोविंदा गायकवाड, एकनाथ जाधव उपस्थित होते.