आपला जिल्हा

निम्न दूधनाचे 2 दरवाजे उघडण्यात येणार नदीपात्रात  1016 क्यूसेक्स  विसर्ग सोडण्यात येणार

नदीकाठच्या गावांना सतर्क राहणेबाबत सूचना

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता आज दि. 08-09-2024 रोजी 15.00 Hrs. वाजता* प्रकल्पाचे 2 दरवाजे प्रत्येकी 0.15 मीटरने उघडण्यात येणार असून नदीपात्रात  एकूण 1016 Cusecs इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याबाबत, तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना महसूल विभागामार्फत तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात यावा, ही विनंती.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल व तसे आपणास वेळोवेळी अवगत केले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!