आपला जिल्हा

ग्रामीण जीवनशैलीचं वास्तववादी चित्रण म्हणजे पाचोळा कांदबरी …. डॉ.सुरेश उगले

सेलू ( प्रतिनिधी) : सेलू. रा.रं.बोराडे यांनी ग्रामीण साहित्य आणि मराठवाडी बोलीला प्रतिष्ठा मिळवून दिली .बापाच्या पायातील चप्पल लेकाला येत असेल तेव्हा बापाने कारभार लेकाकडे देणे उचित हे कृतीतून दाखवून देत.स्वतः मोहाच्या आहरी न जाता अनेक साहित्यिक घडविण्यात रा.रं.बोराडे सरांचा मोठा वाटा राहिला आहे.गावाचे होणारे नागरीकरण.पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव कांदबरीत पाहायला मिळतो. कादंबरीतील लिखाण हे गंगाराम या व्यक्तीला गृहीत धरून केलेले लिखाण ग्रामीण जीवनशैलीचं वास्तववादी चित्रण पाचोळा या कादंबरीत वाचायला मिळते. खेड्यातील लोक कसं जीवन जगतात आणि समस्यांशी सामना करण्यासाठी तत्परता दाखविली जाते हे या पाचोळा कांदबरीतून जाणवते. विद्यार्थी दशेत ही कांदबरी मनाला भुरळ घालण्याचं काम करत आहे. असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय,सेलू येथील ग्रंथालयात आयोजित एक दिवस एक पूस्तक या उपक्रमात प्रा.डाॅ.सुरेश उगले यांनी केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी सौ.मधुबाला बोराडे म्हणाल्या, की मराठी भाषेला गौरवशाली परंपरा आहे.मराठी भाषा ही ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण एकीकडे राजभाषा म्हणून पुढाकार घेत असताना आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत आहोत. पैसा पैसा करत आपण आपल्या मुळ संस्कार आणि संस्कृतीला विसरत चाललो आहोत. संस्कार आणि संस्कृतीची जीवनमूल्ये ही खेड्यातील पूर्वीचे लोक जपण्यासाठी धडपडत असतात. अलिकडच्या काळात मोबाईल संस्कृतीचा प्रपोगंडा वाढल्याने मुळ संस्काराला तिलांजली देत आहेत. प्रत्येकाने मराठी भाषा आणि आपली बोली भाषा जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गव्हाणे,सूत्रसंचालन प्रकाश भालेराव तर आभार संध्या फुलपगार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मधुबाला बोराडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कथाकार राम निकम हे होते.
कार्यक्रमास डॉ शरद कुलकर्णी,चंद्रशेखर मुळावेकर, संजय विटेकर, गंगाधर गुंजकर,प्रा.आनंद देशमुख, गंगाधर गळगे ,नारायण इक्कर,प्रा.अनिल कुलकर्णी, रघुनाथ देशमुख,सर्जेराव लहाने,विजय ढाकणे, प्रा.केरबा वाघमारे,प्रकाश गटकळ,रामचंद्र गजमल,रवि मुळावेकर,प्रा.अनंत मोगल उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालयाचे महादेव आगजाळ,पंडीत जगाडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!