आपला जिल्हा

डी.सी.डुकरे यांना नागरी विकास सेवासंस्थेचा पुरस्कार प्रदान

परभणी ( प्रतिनिधी ) नागरी विकास सेवाभावी संस्था संभाजीनगरच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर रोजी राज्य स्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळ्याचे तेजस्विनी इंग्लिश स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी ता.पुर्णा शाळेचे मुख्याध्यापक,इंग्रजी विषयाचा तीस वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असलेले अध्यापक,स्मार्ट पीटी पहिली इंग्रजी ते आठवी इंग्रजी प्रशिक्षणातील प्रशिक्षक,यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी बाणेर पुणेच्या जिल्हास्तरीय तीन वर्षे इंग्रजी प्रशिक्षणातील प्रशिक्षक,जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांबाबतीत शिक्षक प्रशिक्षणातील जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक,इयत्ता दहावी सुधारित अभ्यासक्रम इंग्रजी विषय प्रशिक्षक,एन.सी.इ.आर.टी.भोपाळ अंतर्गत एस.सी.इ.आर.टी.पुणे स्तरावरील प्रशिक्षणार्थी,सांसकृतीक स्त्रोत एंवम प्रशिक्षण केंद्र दिल्ली अंतर्गत उदयपूर येथील राष्ट्रीय प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी,जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष,राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष डी.सी.डुकरे यांना तेजस्वीनी इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री दिगंबर बंगांळे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाचे ऑड आनंदजी बायस,प्रमुख उपस्थितीतीत मिलींद पाटील होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक एल.डी.ताटू यांनी केले.या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्य मुख्याध्यापक महासंघाचे राज्य सचिव किरणजी मास्ट,राज्य कार्याध्यक्ष मनोज पाटील,छत्रपती संभाजीनगर जिल्हध्यक्ष सुनिजी जाधव,प्रा.दिलीप जाधव,प्राध्यापक डाॅ.विवेक पिसे आदींसह असंख्य शिक्षक, प्राध्यापकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!