आपला जिल्हा

जेष्ठ पत्रकार नारायणराव पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन — जेष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती

सेलू (प्रतिनिधी)दि 03 येथील अधिस्वीकृतीधारक तथा जेष्ठ पत्रकार नारायणराव पाटील यांच्या पासष्टी व सौ नलिनी नारायणराव पाटील यांच्या एकसष्टी सोहळ्यानिमित्त दि 05 सप्टेंबर गुरुवारी येथील साई नाट्य मंदिरात सायं.5 वा भव्य नागरी सत्काराचे आयोजन नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या 30 वर्षांपेक्षा आधील काळ नारायणराव पाटील हे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान म्हणून या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते,जेष्ठ नाटककार,चित्रपट दिग्दर्शक तथा संगीतकार पुरुषोत्तम बेर्डे मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर,तर स्वागताध्यक्षपदी माजी आ.हरिभाऊ लहाने हे उपस्थित राहणार आहेत.विशेष उपस्थिती म्हणून साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,माजी सभापती अशोक काकडे,स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय साडेगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व सेलूकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी ,सर्व सदस्य व पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!