आपला जिल्हा
दिव्यांगाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू :- पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
दिव्यांग संघटनेच्या वतीने 51हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्र्यांकडे सुपूर्द

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू-परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील दिव्यांगांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू प्रसंगी विधिमंडळात प्रश्न मांडू व दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली.






