आपला जिल्हा

युवकांनो लोकशाही मुल्य आचरणात आणा – डॉ. सुरेश हिवाळे

सेलू ( प्रतिनिधी ) युवकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाही मुल्य आपल्या जीवनात आचरणात आणावीत. यामुळे लोकशाही बळकट होईल. सोबतच युवकांचे भविष्यही उज्ज्वल होईल. असे प्रतिपादन नूतन विद्यालयातील सहशिक्षक डॉ. सुरेश हिवाळे यांनी काजळी रोहिणा येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात शुक्रवार ( दि. १७ ) रोजी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश कुलकर्णी हे होते. नूतन महाविद्यालयाचे काजळी रोहीणा येथे ‘ युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी ‘ हा विषय असलेले राष्ट्रिय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश हिवाळे यांचे ‘ लोकशाही मुल्य संवर्धनात युवकांची भुमिका ‘ या विषयावर व्याख्यान झाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘ युवकांनी आपले ध्येय निश्चित करून जीवनाची वाटचाल करावी. आपली पाऊले ग्रंथालयाकडे वळवावीत. पुस्तके वाचावीत. सामाजिक माध्यमांचा वापर विवेक जागा ठेवून करावा. वेळ वाया घालवू नये. आपल्या अधिकारा सोबतच आपले कर्तव्य आणि जबाबदारी याची जाणीव सुद्धा युवकांनी ठेवली पाहिजे. ‘ असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी शिंदे यांनी. तर आभार प्रदर्शन भक्ती फड या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश उगले, प्रा. विशाल पाटील, डॉ. शिवराज घुलेश्वर, डॉ. आर. जे. नाथानी, प्रा. शुभांगी नायकल हे सेवा योजना शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!