आपला जिल्हा

संभाजी ब्रिगेडचे मुंबई येथे २२ ऑगस्टला राज्यस्तरीय अधिवेशन

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार पुरस्काराने गौरव: उपस्थित राहण्याचे छगन शेरे यांचे आवाहन

सेलू :- ( प्रतिनिधी ) मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन २२ ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले आहे, या अधिवेशनास तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी केले आहे

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाचे उद्घाटन खा.अमोल कोल्हे,आ. रोहित पवार,अभिनेते सयाजी शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.संभाजी ब्रिगेडने गेल्या दहा वर्षांमध्ये अर्थकारण चळवळीला प्राधान्य दिले आहे.आर्थिक साक्षरता घडवणे,तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा हेतू आहे.या निमित्ताने विविध कार्यक्रम होत असून प्रसिद्ध लेखक प्रफुल वानखेडे यांची मुलाखत प्रसिद्ध पत्रकार अभिजीत करंडे हे घेणार आहेत.
ज्येष्ठ व्याख्याते निरंजन टकले हे ‘गांधींच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार हे ‘महाराष्ट्र धर्म’ या विषयावर बोलणार आहेत.तसेच ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे मार्गदर्शन करणार आहेत.
समारोपाच्या सत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांचा विशेष शाही सन्मान करण्यात येणार आहे उद्योग व्यवसाय मार्गदर्शनासह विविध मान्यवरांचे सत्कार सोहळे पार पडणार आहे म्हणून तरुणांनी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे,बजरंग आरकुले,निलेश शिंदे,ऋषी चट्टे,शशांक टाके,उत्तम डोंबे,अतुल डख,सचिन रोडगे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!