आपला जिल्हा

सेलुत मजलिसे ऐहरार च्या वतिने रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी !

सेलू ( प्रतिनिधी ) दोन धर्मात तेढ निर्माण करुन द्बवेष पसरविणार्‍या रामगीरी महारांना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन मजलिस च्या वतिने पोलीस प्रशासनास देण्यात आले .
नाशिक येथे प्रवचना दरम्यान सरला बेट चे रामगिरी महाराज यांनी मूस्लीम समाजाचे प्रेषित हाजरत मोहम्मद पैगंबर बदल व धार्मिक गूरूबध्दल अपशब्द वापरून खोटी माहिती सांगितली यामूळे समस्त मूस्लीम समाजाच्या भावना दूखविल्या असून या मूळे सर्व मूस्लीम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.कोणताही धर्म दूसर्‍या धर्माबदल टिका न करण्याचीच शिकवण देतो.परंतु काही लोकं सध्या जाणून बूजून अशा प्रकारची भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात .मूस्लीम समाजाचे पविञ ग्रंथ (कूराण) व हाजरत पैगंबर बदल कोणत्याही प्रकारचे अपशब्द सहन करु शकत नाही .
शासनाने अशा प्रकारे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करून या सारख्या बेताल भाषा व खोटी पोस्ट करणार्‍या लोकांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे मागणी चे निवेदन पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांना देण्यात आले.
या निवेदनावर मजलिसे ऐहरार चू तालूका अध्यक्ष मोहम्मद याहिया खाॅन,हाफेज अमजद इशाती,सय्यद इम्रान हाशमी, मौलाना खाॅजा खासमी, मूफती अब्दूल अजिज मौलाना मूखतदिर,नगरसेवक शेख रहिम, रहिम पठाण,शफीकअली खाॅन,नईम पठाण,इरफानलाला,शेख इरशाद,सोहेल खाॅन,अब्दूल वाजीद,शेख जूबेर,सह आदिजण हाजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!