आपला जिल्हा

सुंदर माझी राखी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केल्या आकर्षक व सुंदर राख्या

नूतन विद्यालयात सुंदर माझी राखी स्पर्धा

सेलू, ता. १७ (प्रतिनिधी ):
शहरातील नूतन विद्यालयात शनिवारी (ता. १७) राखी पौर्णिमेच्या सणानिमित्ताने चित्रकला विभागातर्फे ‘ सुंदर माझी राखी ‘ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी स्वतः च्या कल्पनेने सुंदर व आकर्षक राख्या तयार केल्या.
नूतन विद्यालयात राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चित्रकला विभागातर्फे सुंदर माझी राखी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेतस पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपल्या कल्पनेने सुंदर राख्या तयार केल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उमुख्याध्यापक के. के. देशपांडे, डी. डी. सोन्नेकर, गणेश माळवे आदिंनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी कला शिक्षक आर. डी. कटारे, फुलसिंग गावीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


स्पर्धा यशस्वीतेसाठी शिल्पा बरडे, काशिनाथ पल्लेवाड, केशव डहाळे यांनी पुढाकार घेतला.
सूत्रसंचालन डॉ. संतोष मालसटवाड यांनी तर आभार आर. डी. कटारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!