आपला जिल्हा

शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. :- ॲड.सय्यद फैज

सेलू ( प्रतिनिधी ) प्रतिनिधी
येथे आज दिनांक 15 ऑगस्ट 24 गुरूवार रोजी सकाळी 10 वाजता हाजी खुर्रम फंक्शन हॉल येथे अल- फलाह एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी तर्फे एन. इ .पी .2020 व शिक्षकाची बदलती भूमिका या वर परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रम चे अध्यक्ष इंजिनीअर अनिस कुरेशी, प्रमुख पाहुणे श्री इंजिनिअर वाजीद कादरी (अध्यक्ष जमातें इस्लामी, औरंगाबाद )तर श्री. ॲड.सय्यद फैज (संस्थापक अध्यक्ष आय .आर. सी. एजूकेशन अँड ट्रस्ट औरंगाबाद,) सोसायटी चे सचिव श्री. हाजी शफिख अली खान, गौरव सेवा भावी संस्था चे अध्यक्ष श्री रहीम खान, फातेमा सेवा भावी संस्था चे श्री. अब्दुल कदीर होते.
या वेळी प्रमुख पाहूने श्री सय्यद फैज यांनी सांगितले कि शाळेचा दर्जा हा शिक्षकच्या दर्जा वर अवलंबून असतो
शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करावा.
शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.

जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.
तसेच इंजिनिअर वाजीद कादरी यांनी सांगितले कि अशक्य हा शब्दच डोक्यातून काढून टाकावा, मन लावून, जिद्दिने, आत्मविश्वासाने शिक्षक व विध्यार्थी हे नाते आज च्या घडी ला बदलत जात आहे विविध स्पर्धा होत आहे शिक्षक च जर पात्र नसेल तर पुढची पिढी बरबाद करणारा आहे असे त्याने समजून घ्यावे . या साठी शिक्षकांनी पुढे यावे उर्दू विध्यार्थी चे शिक्षण मध्ये फार मागास पन दिसत आहे गोर गरीब विध्यार्थी विध्यार्थीनि ला मदत करावी असे आवाहन या वेळी केले गौरव सेवा भावी सस्थे चे अध्यक्ष श्री रहीम खान यांनी शुभेच्छा पर आपले मनोगत व्यक्त केले
तसेच अल फलाह एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 12 मुस्लिम शिक्षक सेवा निवृत्ती झालेल्या चा सन्मान सोहळा या वेळी करण्यात आला कार्यक्रम चे अध्यक्ष समारोप संस्थेचे अध्यक्ष इंजि. अनिस कुरैशी, यांनी केले पाहुण्यांचे स्वागत शेख महेमूद सर,शमशोद्दिन, पठाण इंजि. रशिद खान, हारुण सर, जावेद घौरी, इम्रान कुरैशी, शेख असगर आदिंच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात इमाम सर यांनी कुराण शरीफ पठणाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल फलाह एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सचिव हाजी शफिख खान यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कोषाध्यक्ष तथा साईबाबा बँक चे व्यवस्थापक पठाण निसार यांनी करुन दिला. कार्यक्रम चे आभार श्री हारून सर यांनी केले सूत्रसंचालन शेख मौजम सर यांनि केले कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी, सोहेल खान, शहेजाद खान, मोठलिया इम्तियाज, फारोखीअफान,हसनाईन कुरेशी, फरहान कुरेशी, नौमान कुरेशी, सलमान कुरेशी इत्यादी नि परिश्रम घेतले या चर्चासत्र मध्ये शहरातील उर्दू शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!