आपला जिल्हा

गटकळ अकॅडमी सेलू ची वैष्णवी प्रकाश राठोड यांची पुणे कारागृह पोलीस पदी निवड

सेलू ( प्रतिनिधी ) नुकत्याच लागलेल्या निकालांमध्ये गटकळ करिअर अकॅडमी ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी प्रकाश राठोड (रा. सोनापुर तालुका जिंतूर जिल्हा परभणी) यांची पुणे कारागृह पोलीस पदी निवड झाली. याबद्दल त्यांचा अकॅडमी तर्फे वाजत गाजत, फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार सत्कार करण्यात आला. तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून गटकळ अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

या सत्कार सोहळा निमित्त अकॅडमीचे संचालक प्रा श्री रामेश्वर गटकळ सर, प्रा श्री दीपक गटकळ सर, गोपाळ ताठे,मैदानी प्रशिक्षक योगेश राठोड, खास शुभेछा देण्यासाठी लक्ष्मी चव्हाण( मुंबई पोलिस),प्रेरणा लाटे (मुंबई पोलिस) वैष्णवी यांचा संपूर्ण परिवार,अकॅडमीतील सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिद्द, चिकाटी, मेहनत व त्याचबरोबर सातत्य टिकून ठेवलं तर तुम्ही यशाला नक्कीच गवसणी घालू शकता असं आपले मनोगत व्यक्त करताना वैष्णवी यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!