आपला जिल्हा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 47 हजार 332 लाभार्थी महिलांचे अर्ज पात्र

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

परभणी दि. 16 (प्रतिनिधी ) : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 57 हजार 276 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 2 लाख 47 हजार 332 पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज ठरले असून, केवळ 7 हजार 606 अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत. उद्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या‌ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार (दि.17) रोजी बालेवाडी क्रीडांगण (पुणे) येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दुपारी 12 वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 जुलै 2024 ते 31 जुलैपर्यंतची ही आकडेवारी असून, या प्राप्त अर्जाची छाननी करुन त्यांना मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत.

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि. 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात आले आहे, ज्या लाभार्थ्यांनी “नारी शक्ती दूत” ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!