आपला जिल्हा

सेलूत स्वतंत्र दिनानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत मोटारसायकल व पदयात्रा रॅली उत्साहात.

सेलू ( प्रतिनिधी ) तहसील कार्यालय, सेलू व पंचायत समिती यांच्या संयुक्तविद्यमाने तिरंगा मोटारसायकल व पदयात्रा रॅली बुधवार ( दि. १४ ) रोजी उत्साहात संपन्न झाली. तहसीलदार शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, मुख्याध्यापक संतोष पाटील, रविंद्र पाठक, रतन गोरे, थटवले, हर्षल टाक, रमेश मरेवार यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. मोटार सायकल रॅलीचा समारोप छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. या प्रसंगी बोलताना तहसीलदार शिवाजी मगर म्हणाले,” हर घर तिरंगा अभियानांतर्गत मोटारसायकल व पदयात्रेत शिक्षक व महसूल कर्मचारी यांनी उत्साहात सहभाग नोंदवून राष्ट्र भावना जागृत केलीे आहे.”

याप्रसंगी नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किरण देशपांडे , न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, नूतन कन्या प्रशालेचे पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांची उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!