आपला जिल्हा

ओबीसींच्या मागण्यासंदर्भात मा. एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, सेलू   मार्फत निवेदन      

⬛ ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करणे, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवणे आणि  ओबीसीच्या नेत्यांना, प्रतिनिधीना धमक्या देणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने आज दि 16 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून ओबीसींच्या मागण्यासंदर्भात मा. एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, सेलू   मार्फत निवेदन  निवेदन देण्यात आले.                                                 

दिलेल्या निवेदनात ओबीसींच्या मागण्या पुढीलप्रमाणे.

 1. ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणना करणे.  2. ओबीसिंचे आरक्षण अबाधित ठेवणे. 3. मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करणे. 4. भारतीय संसदेमध्ये महिला 33 % आरक्षणात ओबीसी   महिलांना 27 % आरक्षण राखीव ठेवने, 5. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व अभ्यासिका उपलब्ध करणे, 6. महाराष्ट्र शासनाने लागू केलेला कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करणे, 7. महाराष्ट्र शासनाने शाळांचे खाजगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करणे, 8. सहकारी संस्थाच्या कायद्यात दुरुस्ती करून ओबीसींना अध्यक्ष व उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती, चेअरमन व उप चेअरमन यामध्ये आरक्षण देणे,9.  ओबीसीच्या नेत्यांना, प्रतिनिधीना धमक्या देणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. 

वरील ओबीसी समाजाच्या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा ओबीसी समाज भविष्यात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करील. करिता आज रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन धरून निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर ओबीसी समाज बांधव सेलू तालुका जिल्हा परभणी,  नानासाहेब राऊत, गणेश नाईकवाडे, प्रकाश मुळे, भागवत दळवे, पवन कटारे,  प्रभाकर इंगळे, बाळासाहेब काजळे,  विकास आढे, भारत इंद्रोके, विनोद तरटे, माऊली राऊत, किशोर कारके, प्रभाकर गिराम, महादेव गायके, एकनाथ टाकरस, गोपाळ बोकन, शिवाजी चौरे, रमेश गोरे, बाळू प्रधान, शाम कटारे,गजानन घुगे, योगेश कथले, पंकज चव्हाण, अरुण हारकळ, गणेश गोरे, माऊली राठोड, कृष्णा गोरे, बाळू गिराम आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!