सेलू (प्रतिनिधी ) साईबाबा नागरी सहकारी बँकेची29वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 13जुलै 2024 रोजी स्वामी रामानदं तीर्थ हिंदी मराठी ग्रथालंय येथे सकाळी 11वाजता संपन्न झाली. या सभेस सभासद उपस्थित होते. सभेची सुरूवात साईबाबा च्या मूर्ती पूजनाने झाली सभेचे अध्यक्ष तथा बँकेचे सस्थापक अध्यक्ष श्री हेमंत आडळकर होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर,माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर, संचालक श्री जयप्रकाश बिहाणी,डिव्ही मुळे मधुकर नाना पौळ, यांची उपस्थिती होती.
प्रस्ताविक व सभे पुढे विषया ची माहिती बँकेचे मु का अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी विषद केले अहवाल वाचन श्री सुभाष चव्हाण यांनी केले या वेळी श्री कांचन कोरडे, ऍड गोविद शेळके, सर्जेराव लहाने, मधुकर नाना पौळ प्रा. प्रभाकर रावते, बळीराम माने आदी नि मनोगत व्यक्त केले बँकेचे नफा- तोटा पत्रक व ताळेबंद 2023-24या आर्थिक वर्षात बँकेने रु. 1 कोटी,89 लाख 96हजार निव्वळ नफा मिळविला. या नफ्यातून कायदेशीर तरतूदी वजा जाता, संचालक मंडळाने सुचविलेला 10% लाभांश सभेने मंजूर केला सस्थेच्या अध्यक्ष यांनी सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन केले मागील आर्थिक वर्षात अ वर्ग प्राप्त झाला असल्याचे सांगितले मार्च 24अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1कोटी 89लाख 96हजार रुपये नफा झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे भाग भांडवलं 6कोटी 2लाख आहे, स्व निधी 21कोटी आहे मार्च अखेर एकूण ठेवी 210 कोटी 68लाख आहेत कर्ज वाटप 120कोटी आहेत नेट एनपीए 0% ग्रास एनपीए 6.23% आहे एकूण सभासद 8896 आहेत सर्व शाखा नफयात आहेत व गेल्या दहा वर्षा पासून 10% लभाष वाटप करीत आहोत सतत दहा वर्षा पासून बँको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप असोसिएशन चा पद्मभूषण कै वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सह बँक पुरस्कार, बेस्ट चेअरमन पुरस्कार मिळाले आहे ग्राहक सभासद यांनी जास्तीत जास्त ए टी एम, पि ओ एस, इ कॉम, मोबाईल बँकिंग, कयू आर कोडं अशा आधुनिक तत्रज्ञान व सुविधा चा वापर करावा असे आव्हान या वेळी नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासद चा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला या वेळी सभेचे सूत्रसंचालन श्रीसुभाष मोहकरे यांनी केले आभार व्यवस्थापक श्री निसार पठाण यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक श्री दत्ता पौळ, संतोष हुगे, अविनाश आडळकर, शेख अबूजर, व सर्व कर्मचारी यांनी घेतले.